हिवाळ्यात केस गळतीचे कारण आणि त्याचे उपाय
केस गळती थांबविण्यासाठी त्याचे कारण ओळखून आणि त्यावर उपचार करणे आवश्यक आहे. आता जाणून घ्या ५ कारगर उपाय जे केस गळती थांबविण्यासाठी फायद्याचे सिद्ध होतील.
कारण :-
* ताण, अॅनिमिया, केसांवर वेगवेगळे प्रयोग, व्हिटॅमिन 'बी' ची कमतरता, प्रोटीनची कमतरता, हाइपो थॉयराईज्म डैंड्रफ, बोरिंगच्या पाण्याने केस धुणे, आनुवंशिक केसांच्या मुळात इन्फेक्शन
नारळ :- केसांना पोषण देण्यात नारळ खूप उपयोगी आहे. नारळाचे तेल कोमट करून केसांच्या मुळात मसाज केल्याने पोषण मिळतं आणि मजबूत होतात. तेल कमीत कमी एक तास तरी केसांमध्ये लावून ठेवावे. याव्यतिरिक्त नारळाचे दूध धुतल्याने फायदा होतो. केसांमध्ये लावून मसाज करून एक तासानंतर केस
अंडी :- अंडी प्रोटीनने भरपूर असतात, याव्यतिरिक्त यात जिंक, मिनरल आणि सल्फर आढळतं. हे सर्व पोषक तत्व मिळून केसांना मजबूती प्रदान करतात आणि केस गळतीवर फायदा
करतात. अंडीचा पांढरा भाग जैतूनच्या तेलात मिसळून डोक्याची मसाज करावी. अर्ध्या तासाने केस धुऊन टाकावे.
कांदा :- कांद्याच्या रसाने केवळ केस गळणंच कमी होत नाही, तर नवीन केस येतात आणि केसांची लांबीही वाढते. आठवड्यातून दोनदा कांद्याचा रस केसांना लावावा आणि अर्ध्या तासाने शाम्पू करावा. हा खूप चांगला उपाय आहे.
लसूण :- सल्फरच्या अधिकतेमुळे लसूण केसांसाठी फायदेशीर आहे. लसणाला नारळाच्या तेलात शिजवून किंवा याचा रस नारळाच्या तेलात मिसळून लावल्याने फायदा होतो.
जास्वंद :- जास्वंदाचे लाल फूल केसांसाठी वरदान आहे. हे वाटून नारळाच्या तेलात मिसळून केसांना १ तास तरी लावून ठेवावे. नंतर केस धुऊन टाकावे. याने डैंड्रफपासून मुक्ती मिळते आणि केस चमकदार होतात.
* केसांच्या मुळांना बळकटी देण्यासाठी ड्राय शाम्पू उपयुक्त ठरतो. पाण्याचा वापर न करता ३० सेकंदांसाठी केसांना शाम्पू लावून ठेवा आणि नंतर धुऊन टाका. * ऑफिसमध्ये जाताना वॉटरप्रूफ मस्कारा वापरा. त्याने मध्ये एखादवेळेस तोंड धुतले तरी मस्कारा टिकून राहील.
* उन्हामध्ये किंवा जास्त वेळ बाहेर राहिल्यावर ओठ कोरडे
पडतात. अशावेळी टिन्टेड लीप बाम वापरा. हे मॉइश्चरायजरचे काम करतो आणि ओठांचा रंग गडद करण्यास मदत करतो.
by:
डॉ. शालिनी सपकाळ
- अमरावती