सावधान! सतत टीव्ही, मोबाईल पाहत बसून राहिल्याने हृदयविकाराचा धोका...

सावधान, सतत जास्त प्रमाणात टीव्ही पहाणे आणि मोबाईलवर बोलत तासन् तास बसून राहात असाल तर तुम्हाला सर्वात जास्त हृदयविकार होण्याचा धोका आहे. ऐवढेच नव्हे तर तुम्ही दररोज दहा तासापेक्षा जास्त बसून राहत असाल तर तुमच्या मानेवर, डोळ्यावर, कमरेवर, पोटावर दुष्परिणाम होऊन तुम्हाला पोटाचा गंभीर आजार होवू शकतो. जर्नल ऑफ दि अमेरिकन हार्ट असोसिएशन यांनी एका संशोधनाद्वारे हा निष्कर्ष काढून गंभीर इशारा दिला आहे.

तुम्ही जर सतत ६० मिनिटे टी.व्ही. बघत असाल किंवा मोबाईल पहात असाल तर हृदयविकाराचा आजार होवू शकतो. मानेचा आजार होवू शकतो. सतत बसून टी.व्ही. पहात असाल तर सर्वात जास्त प्रभाव तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते. त्यामुळे लठ्ठपणा हृदयरोग, मानेचे दुखणे, डोळ्यावर ताण पडल्याने डोळे कमजोर होवू शकतात. ऐवढेच नव्हे तर सतत बसल्याने शररातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले की, ब्रेन स्ट्रोक लकवा होण्याचा जास्त धोका आहे. सतत तुम्ही हवाबंद ए.सी. च्या खोलीत राहात असाल तर तुमच्यात 'डी' जीवनसत्वाची कमतरता होवू शकते. कंबरेच्या खालच्या मांसपेशीत ताण पडून नवे दुखणे सुरू होवू शकते. सतत बसल्याने हृदयावर ताण पडतो आणि हृदयातील रक्तप्रवाह मंद होतो. याचा परिणाम हृदयातील हालचालीवर होतो. सतत बसून राहिल्याने त्यांच्या पचन शक्तीवर वाईट परिणाम होते. त्यामुळे तुम्हाला डायबिटीजचा धोका जास्त प्रमाणात आहे. एका संशोधनात असेह आढळून आले की, सतत दहा तासापेक्षा जास्त बसून राहात असाल तर ब्रेस्ट कॅन्सरचा धोका महिलांना होवू शकतो. याशिवाय एंड्रोमेट्रीयल कॅन्सर होण्याचा धोका आहे. सतत > बसून राहिल्याने शरीरात इन्सुलीन पेशीची संख्या वाढते. यातूनच पुढे कॅन्सरच्या पेशी तयार होवून कॅन्सर होतो, असा निष्कर्ष एका शोधाद्वारे काढण्यात आला. डब्ल्यू.एच.ओ. च्या एका अहवालानुसार ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलोन कॅन्सर असणारी एक तृतीयांश रुग्ण हे सतत बसून राहणाऱ्या वर्गातील आहेत. जास्त वेळ बसून राहिल्याने मेंदुच्या सक्रियतेवर नकारात्मक प्रभाव पडत असतो. सतत बसून राहिल्याने रक्तप्रवाह कमी होऊन मेंदूपर्यंत शुद्ध रक्त व प्राणवायुचा पुरवठा कमी प्रमाणात होतो आणि त्याचा सरळसरळ प्रभाव मनुष्याच्या एकाग्रतेवर होतो, असे या अहवालात म्हटले आहे.

रोगमुक्त होण्यासाठी

* दोन तासापेक्षा जास्त काळ एका जागी बसू नका

* नियमित सकाळी योगासने करा, शरीराची हालचाल अवश्य करा.

* जेवणानंतर ५ ते १० मिनिटे वज्रासन करा

* सकाळ संध्याकाळ जेवण- नास्ता याची वेळ पाळा

* सतत टीव्ही पाहू नका, थोड्या वेळाने फिरा, रोज पायदळ चालत रहा

* कॉम्प्युटरवर काम करताना पायाची बोटाची हालचाल करा, पोझीशन बदल

* पौष्टीक अन्न खा, कोणतेही व्यसन करू नका.

Comments (0)

You must login to post comments!