अनेक आजारांवर गुणकारी आवळा

सध्या बाजारात आवळ्याचा सीझन सुरू झाला आहे. आवळा शरीरासाठी अतिशय उत्तम मानला जातो. आवळा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत आहे. सोबतच आवळ्यात कॅल्शियम, आयर्न, फॉस्फरस, फायबर आणि कार्बोहायड्रेट, अॅण्टी- ऑक्सिडेंट्सही असतात. रोज आवळा खाल्ल्याने अनेक रोगांपासून आपला बचाव होऊ शकतो. रोज सकाळी एक ग्लास पाण्यात १० मिली आवळ्याचा ज्युस मिसळून प्यायल्याने शरीरातील सर्व विषारी द्रव्ये बाहेर जाण्यास मदत होते.

उच्च रक्तदाब, मधुमेह : आवळा, आवळ्याचा ज्युस उच्च रक्तदाब, मधुमेही रुग्णांसाठी गुणकारी आहे. अनेक डॉक्टर हाय ब्लडशुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी आवळा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात.

मॉर्निंग सिकनेस : गर्भवती महिलांना सकाळी झोपून उठल्यावर अनेकदा त्रास होतो. या मॉर्निंग सिकनेसपासून बचाव करण्यासाठी आवळा उत्तम उपाय आहे. सकाळी उठल्यावर चक्कर किंवा उलटीसारखं होत असल्यास कच्चा किंबा सुकवलेल्या आवळ्याचा एक खाल्ल्याने फरक जाणवतो.

पचनशक्ती वाढते : पचनासाठी आवळा नैसर्गिक उपाय आहे. नेहमीच अपचनाचा त्रास होत असल्यास २ ते ३ आवळ्याचे तुकडे खावेत. डायजेस्टिव्ह गोळ्या किंवा अॅन्टीॲसिड औषधांपेक्षा आवळा उत्तम उपाय आहे.

आवळा पचनतंत्रामध्ये गॅस्ट्रिक लिक्विड उत्पन्न करण्यास मदत करतो. हे लिक्विड पचन प्रक्रिया वाढवण्यास मदत करते. बद्धकोष्टता, गॅस, अॅसिडिटी, पोटासंबंधी अनेक समस्यांमध्ये आवळा फायदेशीर ठरतो.

तोंडाला दुर्गंधी : ज्या लोकांना सतत तोंडाला दुर्गंधी येण्याची समस्या असते, त्यांच्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे. सुक्या आवळ्याचे तुकडे जवळ ठेवा. ज्यावेळी दुर्गंधी जाणवेल, त्यावेळी २ ते ३ आवळ्याचे तुकडे खा. अॅन्टी-इन्फ्लेमेंटरी तत्त्व असलेला आवळा दुर्गंधीचं कारण बनणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करतो.

Comments (0)

You must login to post comments!