बाह्य शृंगारापेक्षा अंतर्गत संस्कार महत्वाचा
परवा एका व्यक्तीने लग्नाचा वाढदिवस साजरा करून तो मिडीयावर प्रदर्शीत केला. आपल्या पत्नीचा श्रृंगार हार सोन्याचा दिखावा केला. केवळ स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी पण ती केंव्हाही महागात पडणारी आहे. हार असली की, नकली हा प्रश्न नव्हे, तर बाह्य श्रृंगार करून मिडीयावर दाखविणे चुकीचे आहे. त्यापेक्षा ज्ञानाचा श्रृंगाराने लग्नाचा वाढदिवस साजरा करता आला असता आजची स्थिती काय? आपण आपले सरकार कोणत्या परिस्थितीतून जात आहोत याची जाणीव नाही का? हजारो लोक मरतात स्मशानात जागा मिळत नाही अन् आपण हे माझे ते माझे करतोय आणि वेगळी प्रतिष्ठा प्रदर्शित करतो अनावश्यक खर्चात आपले क्षणिक जीवन व्यथित करतो. गाड्या घोड्याची व बेताल वक्तव्य अज्ञानाचे प्रदर्शन मोठे पणा कशासाठी? काय आपल्या सोबत येणार आहे. हजारो आले आणि हजारो गेले सोबत काय नेले अन् आपण बाह्य श्रृंगारात आपले जीवन संपवित आहोत. या देशाची ५०% संपत्ती ही अॅश आराम गाडी घोड्यात आणि श्रृंगारात संपत आहोत. तुकाराम महाराज म्हणतात हे सोने नाणे हे आम्हा मृतीका समान हो. बाह्य सौंदर्य कशासाठी फुलवायचे लाखो रुपयाची जाहिरात मिडीयावर का? साध्या साबनेची केसाची, तेलाची, पेस्टची, स्त्री पुरुषांच्या अंतर वस्त्राची जाहिरात किळसवाणी वाटते. हे पहात असताना आपल्या सोबत आपली पत्नी, मुलगी, सुन ते पहात
असतो सरकारने हे प्रकार बंद केले पाहिजे. व्यर्थ चर्चा मी तू मध्ये लोकांना मुर्ख बनवित आहात हे कळतय आम्हा देव देशाबाबत घेणे देणे आहे किंवा नाही याचे चिंतन व अनुकरण महत्त्वाचे वाटते आज प्रत्यक्ष शेतात काम करणारा शेतकरी किती त्रासात जीवन जगतो त्यांना आर्थिक बळ देणे त्यांच्या मुलाबाळाचे संवर्धन करावे त्यालाच खरी जाणीव असते. या बाबतीत बौद्धीकदृष्ट्या सक्षम असेल त्यांना प्राधान्य देवून त्याच्या जीवनाचा विकास होईल अशी कृती करावी. मानवी कल्याणासाठी आपले जीवन सार्थकी जाईल याची नितांत आवश्यकता आहे. कोट्यवधीचे गैर व्यवहार उजेडात येतात. ही देशासाठी चांगली बाब नाही. बाहेर देशात आपल्या देशाचा लौकिक फार मोठा आदरानं देशाचे नाव घेतात अन् आपण प्रॉपर्टी व प्रतिष्ठेसाठी का? तळमळतो. साहेबांना भेटण्यासाठी १०० नोट गेटवर ठेवली तरच मध्ये प्रवेश । नसता साहेब कामात सांगितले जाते. मग पुढे साहेबांची भेट झालीच तर बरे । म्हणून टोलवाटोलवी होते अन् गरीबांचे कामे होत नाहीत. या देशाचे अनेक प्रश्न प्रलंबीत का राहतात. न्यायालयात प्रकरणे ही तारीख पे तारीख होते. खुप प्रश्न प्रलंबीत आहे. चहुकडे पैसाच पैसा हवा तर फाईन पुढे जाते ही स्वतंत्र देशात खेदाची बाब आहे. मुली सुरक्षीत नाहीत. कारण काय शारीरिक प्रदर्शनावर भर. जाहिरातीवर मोठ मोठी कलाकार येतात हे चांगले नव्हे. मोठ्या कलाकाराचे वय झाले याचे भान ही नाही. कोणासाठी कमाई करायची आणि किती केवळ प्रतिष्ठाच हे सगळ संपलं पाहिजे म्हणूनचे बाह्य प्रतिष्ठेपेक्षा अंतर्गत प्रतिष्ठा ज्यातून लोक कल्याण
साधेल अन् राष्ट्र उन्नती साधेल देश समृद्ध होईल. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ । रोज देशात नवीन समस्या निर्माण होत आहे. एक घर सुखी नाही मंत्री संत्री देखील दुखीच आहेत. अधिकारी परेशान आहेत. केव्हाही कोणता प्रश्न उपस्थित होईल याचा नेम नाही. निसर्ग केंव्हाही कोसळेल हवामान असमतोल निर्माण झाले की, हजारोचे नुकसान एकमेकांवर दोष देण्यात वेळ जातोय. प्रत्यक्ष कृती अपेक्षित आहे. अनावश्यक योजना बंद कराव्यात समाज उद्धाराची गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत घेवून जाणारी हवा निर्माण करावी. प्रत्यक्ष पैशाच्या मागे नको मानव सेवा हीच ईश्वर सेवा अशी प्रतिज्ञा घेवून बाहेर पडणाऱ्यांनी पुण्य वाटून घ्यावे. आपला देश विज्ञाननिष्ठ असून अध्यात्मामुळे आपले जीवन सुखी समृद्धी आत्मसात करतो. शारीरिक वेदनासाठी अॅलोपॅथीमुळेच जगाचा विकास होतो. डॉक्टर हे आमचे देवच आहेत. करोनाच्या काळात त्यांची सेवा अतुलनीय झाली. त्यामुळे करोना नियंत्रणात येतोय हे विसरता येणार नाही. प्रत्येकानी आपआपसातील हेवे दावे विसरून (मानव बचाव अभियान) निर्माण करून समाजातील अज्ञान दूर करून नवचैतन्य निर्माण होईल याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
by:
दत्तात्रय डहाळे
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता वसंतनगर, नांदेड