'गूळ-फुटाणे' खाण्याचे फायदे

रोज खा गूळ-फुटाणे, सौंदर्य जपा

गूळ-फुटाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. गुळ- फुटाणे खाल्ल्याने शरीराला पोषण तर मिळतेच, शिवाय सौंदर्यातही भर पडते.

चेहरा उजळतो :- यामधील झिंक म्हणजेच जस्त त्वचा उजळण्यास मदत करते. झिंक त्वचेला तजेला प्रदान करते. याचे नियमित सेवन केल्याने स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढते.

स्मरणशक्ती वाढते :- गुळ व फुटाणे खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होते. यामधील व्हिटॅमिन 'बी' स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते.

दातांची सुरक्षा :- गूळ व फुटाणे दातांना सुरक्षित ठेवतात. यामधील फॉस्फरस दातांसाठी उपयोगी आहे. गर्भावस्थेनंतर स्त्रियांनी गुळ-फुटाणे खायला हवे.

हृदयाचे आरोग्य :- यातील पोटॅशियम हृदयविकारापासून रक्षण करते. हृदयासंबंधित समस्यांसाठी गूळ-फुटाणे उपयोगी आहेत.

अपचनापासून मुक्तता मिळते :- गूळ-फुटाणे नियमित खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. यामुळे अपचन व अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळते. स्त्रियांना बहुधा पोटाचा त्रास होतो. अशा वेळी गूळ-फुटाणे खाणे योग्य ठरते.

Comments (0)

You must login to post comments!