स्त्री शक्ती

अफाट शक्ती तुज पाशी
कामगिरी तू कर साजेशी
अबला तू नाहीस
कर तू साहस.....

घाबरू नको तू संकटाला
रूप तुझे दुर्गेचे
तोड लचके शत्रूचे...

सन्मान तू देशाचा
गुण तुझ्यात कर्तृत्वाचा
घाबरू नको कशाला
जागे कर तुझ्या आत्मविश्वासाला
संधी दे स्वतःला......

तुझ्या संगे आहे जनसागर
आहे सोबत स्त्री शक्तीचा जागर
तू आहे अनमोल मूर्ती
झळकू दे सर्वत्र तुझी कीर्ती...

आहेत तुझे अनेक रूप
दे त्या प्रत्येक रुपाला स्वरूप
सावर तू स्वतःला
ओळख तू तुझ्यातल्या शक्तीला......
तूच दुर्गा तूच भवानी तूच चामुंडा
तूच रेणुका तूच सरस्वती
तूच अन्नपूर्णा तूच काली तूच लक्ष्मी.......

गौरव त्या नारी शक्तीचा
अभिमान आहे आम्हा
सर्व स्त्री जातीचा

by:
सौ. माधवी रत्नपारखी

- नागपूर

Comments (0)

You must login to post comments!