आयुष्याच्या शेवटच्या क्षणी "तो" मरणयातना भोगत होता.. एक सत्य अनुभव
कोविड सेंटरमध्ये एका बेडवर एक कोरोना पेशंट होता. त्याला दोन दिवसापूर्वी सरकारी दवाखान्यात भर्ती केले होते. कारण त्याच्या गाडीचा अॅक्सीडेंट झाला होता. त्याची गाडी एका झाडावर आदळली. कारण तो दारू पिऊन गाडी चालवित होता. नातेवाईकांनी दवाखान्यात आणले. मेंदूला खूप मार लागला होता. हात पाय तुटले होते. रक्त खूप गेले होते. तो बेशुद्ध होता. त्याच्या गटाचे रक्त मिळत नव्हते. तो पेशेवर किलर होता. लोकांचे पैसे घेऊन खून करून पैसा खूप कमावला होता. पण कर्म चांगले नव्हते. मेंदूला हातापायाला बँडेज होते. उपचार चालू होते. त्यातच त्याला कोरोना झाला. म्हणून तो कोविड सेंटरमध्ये होता. त्याला उपचारानंतर शुद्ध आली पण हातपाय हलविता येत नव्हते. तोंडाने पाणी सुद्धा मागता येत नव्हते. तो परावलंबी झाला होता. त्याला असह्य वेदना होत होत्या. त्याचे हाल बघवत नव्हते.
तो देवाला प्रार्थना करून मरण मागत होता. कारण तो जिवंतपणी मरणयातना भोगत होता. पण त्याला मरण येत नव्हते. तेंव्हा त्याला आपण आजपर्यंत केलेल्या कुकर्माचा चित्रपट दिसू लागला. वयाने तरुण होता. तरी वेदना सोसत नव्हता. कारण देवाची लाठी पडले की तीचा आवाज होत नाही. पण माणसाला मरणयातना होतात. आपण आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना काठीने मारून, उपाशी ठेवून कसे घराबाहेर काढले. त्यांची संपत्ती त्यांच्यावर जबरदस्ती करून कशी आपल्या नावावर करून घेतली. ते दयेची भीक मागत असताना त्यांना लाता मारून हाकलून दिले. कित्येक लोकांची पैशासाठी निर्घृण खून करून हत्या केली. ते सुद्धा जीवदान मागत होते. कित्येक मुलांना किडनॅप करून त्यांचे हाल करून खंडणी वसुली केली. पैसे न मिळाल्यास त्यांची दगडाने ठेचून, चाकूने हात पाय कापून हत्या करून पोत्यात भरून नदीत फेकले. त्या चिमुकल्या जीवाच्या डोळयातील मरणाची भिती, त्यांचे केविलवाणे रडणे, कशाचीही पर्वा केली नाही. कीव आली नाही. अल्पवयीन मुलींना पळवून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांना मारून टाकले. त्या मुलींनी फोडलेला टाहो, जीव वाचविण्यासाठी केलेला आकांत काहीच मला दिसले नाही. एकतर्फी प्रेम करून प्रेमात पराभव झाल्यामुळे भररस्त्यात तरुण मुलीच्या तोंडावर ऍसिड टाकून तिला जाळले, तिला मरणाच्या दारात टाकले. ती कितीतरी दिवस मृत्युशी झुंज देत होती. जीवघेण्या मरणयातना सहन करीत होती. मला त्याचे दुःख झाले नाही. मी सूड घेतल्याचा अघोरी आनंद उपभोगत होतो. खुश होतो. हुंड्यासाठी माझ्या लेकरांच्या आईला घरात रॉकेल टाकून जाळून टाकले. माझ्याच पोटच्या मुलांच्या केविलवाण्या रडण्याचा पत्नीच्या किंचाळण्याचा, वाचवा, वाचवा म्हणून जीवाच्या आकांताने ओरडण्याचा माझ्या मनावर किंचितही परिणाम झाला नाही.
मला अघोरी आनंद होत होता. असे अनेक पापे मी केले. शेताच्या धुऱ्यासाठी कुन्हाडीने सख्या भावाचा खून केला. त्याला विहिरीत ढकलून दिले. पैसे देऊन आत्महत्या केल्याचे दाखविले असे अनेक दृष्य डोळ्यापुढून एकामागून एक सरकत होते. शरीराला व मनाला भयंकर जीवघेण्या वेदना होत होत्या. पण मरण येत नव्हते. कारण त्याचे कुकर्म, कुबुद्धी, सुडबुद्धी, दुर्बुद्धी, लहान लेकरांच्या, आत्म्याचे शाप, अल्पवयीन मुलींच्या आत्म्यांचे शाप, तळतळाट त्याला शांतपणे मरू देत नव्हते. कुमार्गाने कमावलेला पैसा कामी येत नव्हता. तो देवाला लाच देऊन मला मागू शकत नव्हता. आपण केलेले पाप आपल्याला चैन पडू देत नाही सुखाने मरू देत नाही.
इतिहासात औरंगजेबकी आखरी रात प्रसिद्ध आहे. त्याला मरणाच्या शेवटच्या रात्री आपण आयुष्यभर केलेली सर्व पापे आठवत होती व तो तडफडत होता. अल्लाला मरणाची भीक मागत होता. मरण येत नव्हते.
म्हणून संत म्हणतात, शेवटचा दिवस गोड व्हावा, त्यासाठी जीवनात चांगले सत्कार्य करावे, समाजसेवा करावी. अडलेल्यांना मदत, गरीबाला मदत करावी. तहानलेल्यांना पाणी व भुकेल्यांना जेवण द्यावे. प्राणीमात्रांवर, मुक्या जनावरांवर प्रेम करावे. त्यांची तहान भूक जाणून त्यांना चारा व पाणी द्यावे. सर्वांचे आशिर्वाद घ्यावे.
जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान।
ये है गीताका ज्ञान। ये है गीता का ज्ञान।।
by:
सौ. सुनिता मेंडुलकर
- वरोरा