आनंदी आणि सुखी उतारवयासाठी आर्थिक स्वावलंबन आवश्यक
प्रत्येकाने आपल्या म्हातारपणाची काळजी आतापासून करायला हवी तुमच्याजवळ जे काही आहे ते आताच मुलांना वाटून देण्याची घाई करू नका. अन्यथा तुमच्यापुढे लाचारीचे जगणे येईल. आपल्या पुढे वाढलेले ताट यावे परंतु बसण्याचा पाट कधीही देऊ नये. तुमच्याजवळ पैसा असेल तर तुमच्या सर्व गरजा पूर्ण होवू शकेल अन्यथा तुम्हाला कुणीच विचारणार नाही. सर्वच मुले सुना वाईट नसतात. पण सर्वांना सर्व काही लगेच देऊ नये कारण मृत्युनंतर सर्व त्यांनाच मिळणार आहे.
अलीकडे माणसाचे वयोमान खुपच सुधारले आहे. आयुष्य वाढले आहे. हे सर्व चांगलेच आहे. परंतु निवृत्तीनंतर तुमची औषधी, शस्त्रक्रिया, खाण्यापिण्याचा खर्च केवळ निवृत्तीवेतनावर भागणारा नाही. त्यामुळे माझे पेन्शनवर भागते सर्व मुलांना देऊन टाका असा विचारही मनात आणू नका. प्रत्येकाने आपल्या उतारवयाची काळजी घ्यावी. त्यासाठी पैशाची आवश्यक तेवढी तरतूद करावी. सगळ्या गोष्टी गृहित धरूनच आपले उतारवय आनंदाचे जावे, आरोग्यपूर्ण असावे, यासाठी प्रत्येकाने आतापासून तजवीज करावी तरच आनंदात म्हातारपण जाईल. वि.वा. शिरवाडकर यांनी नटसम्राट हे नाटक लिहिले होते. त्यात
बेलवणकर जेव्हा आपली संपत्ती मुलांना देऊन टाकतात. त्यानंतर तेच मुल त्यांना घरातून बाहेर काढतात. मग त्यांच्यावर घर देता का घर ? हे घर शोधण्याची वेळ येते. अतिशय लाचारीची स्थिती निर्माण होते. त्यावेळी त्यांची पत्नी कावेरीबाई उर्फ सरकार म्हणतात. एकवेळ पुढचं बादलेले ताट द्यावे पण बसायचा पाट देऊ नये माणसां मुलावर फाजील विश्वास टाकू नका, आपल्या म्हातारपणाची काळजी घ्यावी. त्यांना सर्वच पैशाची माहिती देऊ नका, संपत्नी त्यांच्या नावावर करण्याची घाई करू नका. मुला-मुलीना देतांना समान हिस्सा था. त्यांच्यात उया भांडणे होवू शकतात. त्यामुळे तुम्हाला म्हातारपणात मोठा मनस्ताप होवू शकतो किंवा तुम्ही त्यांच्या संतापाचे बळी ठरू शकता.
उतारवयात आनंदी राहण्यासाठी दर महिण्याला एक ठराविक उत्पन्न मिळेल याची तरतूद करा, म्हणजे दर महिन्याच्या खर्चासाठी तुम्हाला कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही. आपला पैसा बँकात ठेवतांना एकाच बँकेत पूर्ण पैसा ठेवू नका तर वेगवेगळ्या बँकेत ठेवा. शक्यतो राष्ट्रीयकृत बँकेचा पर्याय निवडा, म्हणजे पैसा बुडण्याची मिती नसते. जास्त व्याज मिळते किया लवकरच दामदुप्पट अशा अमिषाला बळी पडू नका. अन्यथा तुमचा पैसा बुडण्याची शक्यता आहे. लोभ करू नका. पोस्टात किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या चांगल्या बचत योजनेत आपला पैसा गुंतवा. सर्व पैशाची विचारपूर्वक गुंतवणूक करा, अति प्रेमापोटी मुलीला किंवा मुलाला सर्वच पैसा देऊ नका.
तुमच्याजवळ पैसा असेल तरच तुमची मुलं नातेवाईक तुमची कदर करतील. तुम्हाला दोन मोलकरीण ठेवून तुमची सेवा करता येईल. पण पैशाच नसेल तर हाल होईल हे लक्षात ठेवा. पिढ्या बदलतात, पण प्रत्येक पिढीत कोणी ना कोणी ही चूक करतच असते. आईवडील आपल्या मुलांवर अतिशय प्रेम करत असतात. मुलांसाठी किती करू अन् काय करू, असे त्यांना होत असते. अशाच एखाद्या हळव्या क्षणी आपली मुले आपल्याला सांभाळतील, कशासाठी सगळी पुजी आपण सांभाळत बसायची, असा विचार करून जवळ जे काही असेल नसेल ते मुलांच्या स्वाधीन करून मोकळे होतात. प्रत्येक मूल वाईटच निघते असे नाही. पण बव्हंशी अनुभव वाईटच असतात. पुढच्यास ठेच मागचा शहाणा' म्हणून खूप थोडे लोक सुधारतात. अनेकजण परत तीच चूक करतात आणि नशिबाला दोष देत बसतात. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती विजयपत सिंघानिया यांची बातमी होती. त्यांनी आपली संपत्ती मुलाच्या नावाने केली आणि उतारवयात त्यांच्याकडे काहीच राहिले नाही. सुदैवाने हे प्रकरण आपसात मिटले. त्यांची सोय झाली. पण भली भली माणसे कशी मुलांच्या प्रेमात वाहवत जातात, त्याचे हे उदाहरण म्हणता येईल.
वास्तविक आपले जे काही असते. आहे, ते आपल्या माघारी आपल्या मुलांचेच असते. मग ते देण्याची इतकी घाई आपण का करतो? मुलांवरचे प्रेम आणि (अनाठायी) विश्वास, असे उत्तर देता येईल. अर्थात अनेकांना नाईलाजाने आपली पुंजी मुलांकडे सोपवावी लागते. त्यांच्या त्रासाला कंटाळून ज्येष्ठांचेच हाल होतात.
उतारवयात काय काय करायचे हे अनेकांनी सर्व शक्यता गृहित धरून ठरवलेले असते. कोणाला वाचन करायचे असते, कोणाला बागकाम करायचे असते, कोणाला फिरायला जायचे असते. कोणाला आपले छंद पुरे करायचे असतात, कोणाला निवांत आयुष्य जगायचे असते. प्रत्येकाची इच्छा असते. ती कशी पुरी होईल, होईल की नाही हेही माहिती नसते, पण मनात असते. हे जरी सगळे खरे असले, तरी या सगळ्या इच्छा बाळगताना आपला बैंक बॅलन्स चांगलाच असला पाहिजे, याची काळजी घ्यावी, हेच वरील सर्वेक्षण सुचवते. त्यात काही चूकही नाही. आपल्यालाही ते माहिती असते. उतारवयात कोणापुढे हात पसरायला लागू नये हे कोणालाही वाटणारच. तरुणपणात वय असते, धमक असते, तेवढे जाणवत नाही; पण उतारवयात सगळेच उताराला लागलेले असते. तेव्हाच काळजी घ्यायला हवी. अनेकांना ते समजते. त्यापैकी काही लोकांनाही ते समजत असते पण बळत नसते. पुढचे हाल टाळायचे असतील, तर विचारपूर्वकच नियोजन करायला हवे सुखी आणि आनंदी जीवन जगा.