सावधान ! मोबाईल करतो तुमचं आयुष्य उद्धवस्त
सावधान! तुमचा मोबाईल तुमचं आयुष्य उद्धवस्त करतो आहे. तेव्हा त्याला जरा जपूनच वापरा आणि आपलं आयुष्य वाचवा. ऐवढेच नव्हे तर मोबाईलच्या अति वापरामुळे तुमचे डोळे कमजोर होतात आहे. तुमची पाठ, कंबर, मान, मणका आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही तरुण असाल तर तुम्हाला अकाली म्हातारपण येत आहे. तुमच्या मोबाईलच्या रेडीयनसचा तुमच्या मेंदुवर सुद्धा गंभीर परिणाम होतो आहे. त्यामुळे मेंदुची काम करण्याची शक्ती क्षीण होते आहे, असे तज्ञांचे मत आहे. ऐवढेच नव्हे तर ६ महिण्यापासून पाच वर्षापर्यंत लहान मुलांना सतत मोबाईलवर विविध कार्टून फिल्म दाखविण्यात येत असल्यामुळे त्याच्या बालमनावर मेंदुवर, डोक्यावर वाईट परिणाम होतो. मुलांना लहानपणीच मोठ्या भिंगाचा चष्मा लागतो आहे.
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात पाच हजारावर जोडप्यांचे केवळ मोबाईलमुळे घटस्फोट झाले आहे. यापैकी अनेक जोडप्यांची भेट घेतली असता त्यांच्यांत केवळ मोबाईलच्या अति वापरामुळे लग्नानंतर अवघ्या सहा महिण्यापासूनच भांडणे व्हायला लागली.
मोबाईलवर कुणाशी बोलते? ऐवढा वेळ का बोलते ? कमी बोल? रात्री रात्री चॅटींग काय करते? कुणाचे फोटो आले. फोटो मला बघु दे. या मुद्दयांवर नवरा आणि बायकोत सतत भांडणे होवू लागलेत. मोबाईलमुळे दोघेही एकमेकांवर शंका घ्यायला लागले आहे. ऐवढेच नव्हे तर नवरा कुठे आहे हे शोधण्यासाठी ताबडतोब व्हीडीओ कॉल करुन बायको त्याचा शोध करु लागली, त्याच्या मोबाईल मध्ये असलेल्या मुलीचे फोटो कोण ? कोणती मैत्रीण फोटो कस आले? अशा अनेक प्रश्नामुळे नवरा बायकोत दररोज भांडणे व्हायला लागली. तु तुझ्या मैत्रीण सोबत ऐवढा वेळ का बोलते. तु बोलू नको. आई-वडिलांशी, भावा-बहिणीशी ऐवढे काय बोलते 1-सासरे सतत सुनेला याबद्दल सासु- बोलत आहे. रोज-रोज फोनवर चॅटींग होत असल्याने पुरेशी झोप होत नाही. मोबाईलच्या अती वापरामुळे रात्ररात्र जागण्याची मनोवृत्ती वाढली आहे. मोबाईलमुळे मेंदुवर अतिशय वाईट परिणाम होतो आहे. मोबाईल दिवसभरात पाच ते सहा तास वापरत असल्याने मेंदुत केमीकल लोचा होतो आहे. त्यामुळे त्याला मोबाईलचे व्यसन लागले आहे असे म्हणतात. त्याला मानसिक आजार जडतो आहे. तासभरात एखादा फोन आला नाही तर तो अस्वस्थ होतो आणि मोबाईल दहावेळा उचलून बघतो. मोबाईलमुळे घरा-घरात भांडणे होत आहे. प्रत्येकावर नव्याने तणाव येत आहे. बायको आपल्या रुममध्ये मोबाईल पहाते. नवरा गॅलरीत तर दोन्ही मुले आपल्या रुममध्ये मोबाईल बघतात यामुळे कुटुंबात संवाद कमी झाला. संवाद नसतांना ऐकमेकाचे सुख-दुःख कुणीच कुणाला सांगत नाही. त्यामुळे प्रत्येकावर एक मानसिक दबाव येतो असे तज्ञांचे मत आहे. सावध रहा मोबाईलचा वापर कमी करा.