स्वतःला बदला, स्वतःसाठी जगा..
आपण आपल्या जीवनाची गाडी खुप हळूवार चालवत असता. परंतु गाडी चालत असताना आपल्याला कळतच नाही की कोणता आपल्या जीवनाच्या गाडीचा चक्का कोणता झीजत आहे. ती झीजत असतांना गाडी कुठेतरी थांबते. नंतर कळते आपल्या जीवनात हे काय झाले. मग चक्का बदलवायची वेळ येते. तेव्हा चारही चाके बदलावयाची वेळ येते पण तसे होत नाही. कारण कुठेतरी चाकाला खड्डे पडले असतात. मग आपल्या जीवनाची गाडी डगमगायला लागते. नंतर मग आपण जीवनाच्या गाडीचे चक्के बदलवायचा खुप प्रयत्न करतो. पण... ती वेळ आपल्या हातातून कधीच निघून जाते. का निघून जाते?.... कारण आपण कामात, संसारात इतके व्यस्त असतो की, ... स्वतःसाठी थोडाही वेळ देऊ शकत नाही आणि काढूही शकत नाही. कारण... पण का? तुम्ही आपल्या मनात हा विचार आणून बघा वेळ नक्की मिळेल. अहो पण मनच स्थिर राहत नसेल तर स्वतःसाठी वेळ द्यायला वेळ कधी काढू. ही परिस्थिती आपली स्वतःची आहे. आपण हा विचारच करत नाही की स्वतःसाठी आपण काय करू शकतो. आपल्या छोट्या-छोट्या इच्छा पुर्ण करू शकतो. मोठ्या इच्छा पुर्ण करायला स्वतःला खुप झीजवाव लागत. पण त्यातही खुशी नाही हो, सारखी धडपड असते. काम करूनही आपण स्वतःसाठी काही करू शकतो, छोट्या खुषीमध्ये आपण स्वतः मोठी खुषी देऊ शकतो. करू शकतो. कोणाला हसवू शकतो. स्वतः सजु शकतो, कोणाची चांगली स्तुती करू शकतो. परंतु ते पण करायला फार मोठं मनं लागते.
आपण स्वतःला बदलत नाही. कशाचा अहंकार, या नाशीवंत शरीराचा आपण आपल्या विचारांकडे मुळीच लक्ष देत नाही व स्वतःकडे कसं हे जीवन जगायचं पण कसंतरी जगायचं, जीवनाच्या गाडीला बदलवायचा प्रयत्न करून पाहू या... आपल्या मनाला, विचाराला, या जीवनाला, गाडीला समोर नेण्याचा प्रयत्न कसा करायचा, यासाठी आपल्याला बदलायला हवे नाही का?... कुठेतरी स्वतःला वेळ द्या, आपले चांगले विचार, मन, शरीर, आत्मविश्वास हे आपल्या गाडीचे चक्के आहे हे डगमगले की आपलं जीवन अस्त-व्यस्त होते. एक दिवस का नसो हे जीवन आपण परिवारासाठी जगतो परंतु स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करून बघा, कारण एका क्षणाचा भरोसा काही वेगळाच असतो आणि आतातर मुळीच नाही. कारण कोरोना नाही तेव्हा तोंड वर काढतो म्हणून या जीवाला कोरोनाच्या समोर नेण्याचा प्रयत्न करायचा आणि याला कायमचं नष्ट करायचं आणि आपण स्वतःसाठी तर तोंड काढून जगायचं, संसार तर राहतोच, तो कुठे जातो पण स्वतःसाठी, फक्त स्वतः :साठी वेळ काढूया, उद्या येत नाही आलाच तर आपलं भाग्य समजून रोज समोरी जाऊया जगा स्वतःसाठी काहीतरी, आपण करू शकतो काढू शकतो मन शांत करून विचार करूया आणि स्वतःसाठी वेळ काढूया.
by:
सौ. जयश्री संजय रेभे
- वणी, जि. यवतमाळ