व्यथा एका आईची!
क्षणाक्षणाला विचार करणारी, सुख दुःखात साथ देणारी, अडल्यानडल्याला निभावून घेणारी, सर्व संकटावर मात करणारी, परिस्थितीला सामोरी जाणारी, अशी जिच नाव आहे आई, इतिहासात क्षणोक्षणी पानोपानी दिसणारी, अहिल्या, जीजामाता, सावित्री, रमाबाई, रानडे, मदर टेरेसा, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, कल्पना चावला, कमलाबाई होसोट ज्यांनी वृद्धाश्रमाची सोय केली. बाबा आमटे, प्रकाश आमटे, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, सरदार वल्लभभाई पटेल एक नाही अशा कितीतरी वीर पुरुषांनी अशा या कारुण्यमयी, ममतामयी आईच्या कुशीतूनच जन्म घेतलाय तरी सुद्धा स्त्रीला सर्वच ठिकाणी सारखा दर्जा मिळतोय का? स्त्रीचं जीवन हे चार भिंतीच्या आतच दडलेल असत. तिला मानमर्यादा, कर्तव्य, संस्कार यातूनच अग्नीत पोळण्या खंबीर होऊन घराबाहेर पडाव लागतं.
आता हेच बघाना 'स्त्री जन्मा तुझी करुण कहाणी ओठात हसू नयनात पाणी' पण हे कुणासाठी? आपल्या रक्ताच्या पोटच्या गोळ्यासाठी, नऊ महिने उदरात ठेवून सुख दुःखाला सामोरे जाऊन एका गोंडस बाळाला जन्म देते तेही मुलगा असो किंवा मुलगी भेदभाव न करता. रायगडाचा बुरूज चढणारी गवळीनं हिरकणी स्वतःच्या बाळाला दुध पाजण्यासाठी साप, व्याघ्र, अस्वल यांच्याही सामना करत पडत, ठेचाळत स्वतःच्या जिवाची पर्वा न करता केवळ आपल्या बाळासाठी रायगडावरील सर्वच किल्ल्याचे द्वार बंद असताना रायगडाच्या खोल दरीतून खाली उतरून रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात घराकडे परतली. कशासाठी? तर बाळासाठी.
झाशीची राणी लक्ष्मीबाई पती निधनानंतर दामोदरला पाठीशी बांधून ब्रिटिशाच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करून तटावरून घोडा फेकला. कशासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हे तर रयतेच्या स्वातंत्र्यासाठी, ती आई. सावित्रीबाई फुले पतीचा साथ घेऊन शिक्षणाचा बसा चालवणारी अंगावर शेण दगड, गोळे सांडपाणी सहन करून स्त्री शिक्षणांना मान्यता प्राप्त करून देणारी चुल आणि मुल सांभाळून पुढे पाउल टाकणारी सावित्रीबाई फुले तीही एक आदर्श आईच ना. कस असत मुलं छोटी असतात आई वडील काबाडकष्ट करून, ओल कोरड चारून सुख दुःखात सामोरे जाऊन आपल्या पिलांना लहानाच मोठं करतात. उन सावलीतून मायेच्या छायेत आणतात ज्यांच्याजवळ पैसा असतो लठ्ठ पगाराची नोकरी असते. ते आपल्या बाळांना चांगल्या शाळेत नंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात नोकरीला पाठवतात. नंतर काय होत ते तिथेच लग्न करून स्थायी होतात. प्रथम वारंवार पत्र, फोन, मोबाईल येत असतात. आईवडील जोपर्यंत तरुण असतात तोपर्यंत आईबाबांनाही त्याचा फार अभिमान वाटतो. माझा मुलगा उच्च पदावर आहे. त्याला कोणतीच कमी नाही आम्हालापण नाही. तसेच काही वर्ष वाऱ्यासारखे नकळत निघून जातात. आता येत
आईवडिलाच थकत वय. मुल आपल्या संसारात मुलाबाळात व्यस्त असतात. आईबाबाची जबाबदारी एकट्या मुलावरच असते. त्यात त्यांचा कोंडमारा होतो. हळूहळू पत्र व्यवहार अलिकडे बंदच झालेले असतात. फार कमी फोन वाजतो इकडे हे स्वतः मोबाईलवर व्यस्त असल्यामुळे आपण किती दिवस झाले फोन केला किंवा नाही याचा भानच उरत नाही. कारण आता ही मुल सुद्धा आईबाबा झालेली असतात. आता वाढत्या महागाईत मुलांना जन्मापासून तर शिक्षणापर्यंत खुप खर्च उचलावा लागतो, त्यासाठी त्यांना प्रथमच पैशाची जुळवाजुळव करावी लागते. त्यातच महागडी ट्युशन क्लासेसच इतर हॉबी मनोरंजनाची साधणे यांचा मेळ जमविता जमविता त्यांचा जिव अगदीच टांगणीला लागलेला असतो. पुरुषाच्याबरोबर खांद्याला खांदा लावून चालणारी स्त्री ही अनंत काळाची माता असून एक आई देखील आहे. हे विसरून चालणार नाही. मुल बयानी कितीही मोठी झालीत डॉ, अधिकारी किंवा उच्च पदावर गेलीत तरीही ती मुल आईसाठी मुलच असतात.
by:
सारिका दिगंबर कुर्वे
- नागपूर