तुमच्या पैशाची तुमच्यासाठी योग्य गुंतवणूक करा.
तुमचा पैसा तुमच्या भविष्यासाठी कामात पडायला हवा. घर, प्लॉट, फ्लॅट मध्ये गुंतवणूक करताना खुपदा विचार करा, किंवा कोणत्याही योजनेत पैसा गुंतवताना जास्त लोभ करू नका, जास्त लोभापाई तुम्ही पैसा बुडविणार तर नाही. म्हणून काळजी घ्या. पैशाला मोठा करा. काळजी घ्या. सोन्यात गुंतवणूक करताना विचार करा. परंतु रिटर्न चांगले मिळतात.
हे वर्ष प्रचंड अनिश्चिततांनी भरलेले होते. अर्थव्यवस्थेने ग्राहक वर्तणूक, डिजिटल सहकार्य, व्यावसायिक धोरणे इत्यादीबाबत मोठा बदल अनुभवला. मात्र कोविड-१९ च्या साथीतून जग उभारी घेत असतानाही काही बदल घडले आहेत, ते इथे नमूद करायचे आहेत. साथीच्या काळात आर्थिक आव्हान पेलताना आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे अनेक कौशल्ये असणे आवश्यक आहे.. २०२१ मध्ये आपण त्याच प्रकारची शिस्त पाळली पाहिजे, यासाठी कोणतेही कारण नाही. त्यासाठी वैयक्तिक आर्थिक योजना आखणे सोपे आणि हीच दीर्घकालीन परिणाम देईल. २०२१ मध्ये एक नवी जोमाने सुरुवात करण्यासाठी एंजल बोकिंग लिमिटेडचे मिडकॅस-एव्हीपी अमरजीत मौर्य यांनी चार वैयक्तिक धोरणे खाली नमूद केली आहेत.
१. भविष्यासाठी ध्येय निश्चित करा आर्थिक नियोजन करताना पहिली पायरी म्हणजे अल्प किंवा दीर्घकालीन ध्येय निश्चित करणे. ध्येय व अपेक्षित टप्पे निश्चित केल्याने बचत करण्यासाठी ठराविक टाइमलाइन मिळते. स्वतःला विचारा : पुढील ५, १० आणि २० वर्षांत आपल्याला काय साध्य करायचे आहे? तुम्हाला लवकरच एक नवी कार घ्यायची आहे का? घर खरेदी करायचे आहे का? की जास्त भाड्याचे घर घ्यायचे आहे? तुमच्या मुलाच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी तुम्हाला किती बचत करायची आहे ? या सर्वाची कल्पना केल्याने भविष्यात तसे खर्च होण्याची अपेक्षा केली असता, त्याचे बजेट आखण्यास सुरुवात करता येते. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक आर्थिक निर्णयाचे तुमच्या एकूण आर्थिक आरोग्यात काय योगदान मिळेल, याचे मूल्यांकन करणेही याद्वारे सोपे जाईल. ध्येय आखण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, जर काही कारणास्तव आपण ते ध्येय पूर्ण करू शकलो नाही तरीही तुम्ही त्यासाठी केलेले प्रयत्न राहतात, अशी ध्येय आखल्यास तुमच्याकडे काही बचत उरतेच. उदा. तुम्ही नियोजन केल्याप्रमाणे २०२५ मध्ये कार खरेदी करू शकला नाहीत. कारण या काळात काही अनिश्चित खर्च झाले. पण कार खरेदी करण्यासाठी तुम्ही नियमितपणे काही पैसा गुंतवू शंकलात. तुमच्याकडे अजूनही काही पैसा शिल्लक आहे आणि पुढील एक किंवा दोन वर्षांत तुम्ही कार घेऊ शकता. यामुळे ही एक विजयी स्थिती आहे.
२. वैयक्तिक बजेट तयार करा: वैयक्तिक अर्थाचे गणित असो वा एखाद्या प्रकल्पासाठीचा निधी, आर्थिक नियोजनाची प्रक्रिया अर्थसंकल्पाद्दारेच सुरू होते. मग हे बजेट सामान्य खर्च दा. मासिक घरगुती खर्च किंवा आपल्याला अपेक्षित असलेले विशेष खर्च, किंवा पूर्ण गैरेज नूतनीकरण करणे इत्यादींचे असू शकते, बजेटचे काही फायदे होतात. पहिला म्हणजे, याद्वारे हे स्पष्ट होते की, किती पैसा येतोय आणि | किती खर्च होतो. तुमचे बजेट वाढवताना, तुमच्या खर्च करण्याच्या सवयी बदलू शकता. दुसरे म्हणजे बजेटनुसार, | पैशांचे वाटप करणे. याद्वारे तुमच्याकडे आवश्यक गोष्टींसाठी नेहमीच पुरेसा पैसा असेल.
३. स्मार्ट गुंतवणूक करा : तुम्ही खूप कष्ट केले आणि स्वतःचे पैसे मिळवले. हे पैसे सेव्हिंग अकाऊंट किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता. पण तुमच्या पैशांना अधिक मूल्य मिळाले तर? हेच गुंतवणुकीतून साध्य होते. तुमचा पैसा तुमच्यासाठीच वापरला जातो. कम्पाऊंडिंगच्या शक्तीमुळे हे घडते. तुम्ही गुंतवलेल्या भांडवलावरील परतावा तुमच्याच मूल्यात जमा होतो. या कामाची दुसरी यंत्रणा म्हणजे रिटर्न रिस्क ट्रेडऑफ. इक्विटी बाजारात गुंतवणूक केल्यास त्याची स्वतःची जोखीम असते, बाजारपेठेतील अस्थिरता, जिथे किमती सतत अस्थिर असतात, अनपेक्षितरीत्या खाली येतात, हे सगळे जोखमीचे असते. त्यामुळे बाजाराशी संबंधित पर्याय नेहमीच जोखमीचे समजले जातात. बाजार चांगल्या स्थितीत खुला झाला तरी त्याच्याकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन आहे. स्टॉक खरेदी करण्यापूर्वी ट्रेडिंगसंबंधी विविध संकल्पना स्पष्टपणे समजून घेणे आवश्यक आहे. उदा. किंमत, डेरिव्हेटिव्ह, कमोडिटीज इत्यादी. ट्रेडर्स मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे वैयक्तिक स्टॉक किंवा संपूर्ण बाजाराचे मोजमाप करून अंदाज लावतात. त्यानंतर प्रक्रिया रंजक आहे, यासाठी टेक्निकल इंडिकेटर्स वापरले जातात. आकडेवारीच्या आधारे अंदाज लावण्यासाठी इतिहासातील नोंदीनुसार ठरलेले हे पॅटर्न्स असतात. पोर्टफोलिओच्या बांधणीवरही लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. कारण यात विविध पातळ्यांवरील जोखीम व अटींची साधने असतात. यालाच डायव्हर्सिफिकेशन (वैविध्य) म्हणतात. आपण एका किंवा दुसऱ्या संपत्तीत मूल्य गमावल्यास या वैविध्यातूनच सुरक्षितता मिळते. शेअर बाजाराची सुरुवात करताना तो पूर्णपणे समजून घेण्यासाठी ऑनलाइन असंख्य स्रोत आहेत.
४. तुमच्या कराचे नियोजन करा : आपल्या उत्पन्नाचा योग्य वापर करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे करांचे नियोजन करणे. कर नियोजनाद्वारे कराचे ओझे कमी होते, देय कर रकमेवर जास्तीत जास्त परतावा मिळतो. भारतात प्रारि अधिनियम १९६१ मधील ८० के कलमानुसार, १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक कर कपातीस पात्र मानली जाते. परतावे मिळवण्यासाठी आपण असंख्य प्रकारच्या साधनांमध्ये गुंतवणूक करू शकतो. या सेक्शनमध्ये परताव्यांसाठी अनेक दीर्घकालीन पर्यायांचा समावेश आहे. उदा. पब्लिक प्रोव्हिडंट फंड, लाइफ इन्शुरन्स प्लॅन्स, नॅशनल पेन्शन स्कीम इत्यादी, तसेच मध्यमकालीन पर्यायही आहेत. उदा.
५. वर्षांची बँक मुदत ठेव आणि इक्विटी लिंक्ड सव्हिस स्कीम. तुमच्या मुलांची ट्युशन फी भरण्यासाठी, आरोग्य विम्याचे प्रीमियमसाठी तसेच होम लोनची परतफेड करण्यासाठीही कर कपात मिळवता येते. कर वाचवून आपण खर्चासाठी तसेच पुन्हा गुंतवणुकीसाठी जास्त पैसा बचत करू शकतो. त्यामुळे कराचे नियोजन हे एक लाभकारक चक्र ठरू शकते.