कितना बदल गया जमाना

नदीत, तलावात आंघोळ करायला लाज वाटते,
आणि स्विमींग पूलमध्ये पोहण्याला, फॅशन वाटते.
गरीबाला एक रुपया दान नाही करु शकत
आणि वेटरला मात्र १० रु. टिप देण्यात मोठेपणा वाटतो.

पंक्तीत बसून जेवणे ही जुनी पद्धत वाटते,
आणि पार्टीत खाण्यासाठी रांग लावण्यात छान वाटते.
बहीण काही मागत असेल तर फालतू खर्च वाटतो,
आणि गर्लफ्रेंडच्या डिमांडला सौभाग्य समजले जाते.

गरीबाकडून भाजी घेण्यात कमीपणा वाटतो,
आणि शॉपिंग मॉलमध्ये,
आपला खिसा रिकामा करण्यात अभिमान वाटतो.

Comments (0)

You must login to post comments!