तांबे एकमेव शुद्ध धातू, शरीरात उर्जानिर्मिती करते! आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या !
सोने, चांदी प्रमाणेच तांब्याचे खुपच महत्व आहे. तांबे हे सर्वात शुद्ध धातु आहे. त्यामुळेच पुजेत तांबे वापरले जाते. वास्तुयंत्र, लक्ष्मीयंत्र मंत्राची सिद्धता तांब्यापासूनच केली जात. तांब्याच्या कलशात वेद म्हटल्यास मोठ्या प्रमाणावर उर्जा निर्माण होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्याने आरोग्य चांगले राहते. शरीरात उर्जा निर्मितीसाठी तांबे उपयुक्त आहे. रोज रात्री झोपतांना किंवा सकाळी उठल्यावर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या.
तांब्यामध्ये कुठलाई धातू मिसळला जाऊ शकत नाही. त्यामुळे ते शुद्ध समजलं जाते. पुजेत तांब्याचा कलश, तांब्याचा चमचा व पात्र वापरले जाते. हिंदू धार्मिक ग्रंथाव्यतिरिक्त विज्ञानाने देखील तांब्याची भांडी वापरणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, असे म्हटले आहे. धार्मिक मान्यतेनुसार जेथे तांब्याची भांडी किंवा तांब्याच्या वस्तुंचा वापर होतो तेथे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. धार्मिक मान्यतेनुसार जेथे तांब्याची भांडी किंवा तांब्याच्या वस्तुचा वापर होतो... तेथे नकारात्मक उर्जा प्रवेश करत नाही. तांच्याला सुर्याचा धातु म्हटल्या जाते. तांबे हे चांदी आणि सोन्यात सहज मिक्स होते. परंतु तांब्यात कधीही कोणताही धातु मिक्स होत नाही. त्यामुळे तांबे पूर्ण शुद्ध आणि सर्वश्रेष्ठ धातु मानल्या जातो. पुजेत तर तांब्याचा कलस पुजेला मांडल्या जातो.
आयुर्वेदिक महत्त्व
आयुर्वेदानुसार तांच्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी त्रिदोषहारक (कफ, पित्त, वात) असते. त्यामुळे किमान ८ तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी नियमित प्यावे. तांब्याच्या नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्मामुळे पाणी निर्जंतुक होते व आरोग्याच्या दृष्टीनेही अधिक उपयोगी गुणधर्म त्यात सामाविष्ट होतात. कफाची समस्या असलेल्यांनी या पाण्यामध्ये तुळशीचे पान टाकावेत. अशाप्रकारे तांबे आरोग्याच्या दृष्टीनेही उपयुक्त धातू आहे.
असे आहेत आरोग्यदायी फायदे
तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत पचनशनी चांगली होते, कर्करोगाचा धोका टाळण्यास मदत होते. यकृत, मूत्रपिंड निरोगी राहते ताब्यात अँटी इ गुण असल्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीरातील युरिक अॅसिड कमी होते. त्यामुळे संधिवाताची समस्या दूर होते. पोटदुखी, गॅस, अॅसिडिटी आणि बद्धकोष्टताही दर होते.
पुराणात उल्लेख
बराह पुराणानुसार प्राचीन काळी गुडाकेश नावाच्या राक्षसाने भगवान विष्णूंना प्रसन्न केले. तुझ्या सुदर्शन चक्रानेच माझा मृत्यू व्हावा आणि माझे शरीर तांब्याचे बनवावे आणि त्या तांब्याच्या मांड्यांपासून बनवलेल्या वस्तू तुझ्या पूजेसाठी वापरल्या जाव्यातः पृथ्वीवरील कोणताही प्राणी तुझ्या पूजेत तांच्याच्या वस्तूचा वापर करेल, त्यांची उपासना सफल होईल आणि तुझा आशीर्वाद सदैव त्यांच्यावर राहो, असा वर मागितला. श्रीहरी यांनी आपल्या सुदर्शन चक्राने गुडाकेशच्या शरीराचे तुकडे केले. त्यानंतर त्याच्या शरीरातून तांबे, रक्तातून सोने, हाडातून चांदी असे अनेक पवित्र धातू तयार झाले. म्हणूनच पूजेत नेहमी तांब्यापासून बनवलेली भांडा वापरावीत, असे सांगितले जाते बाशिवाय तांब्याला अनेक प्रकारे धार्मिक महत्व आहेत. परंतु आरोग्यासाठी नाचे अतिश चांगले आहे.
by:
डॉ. सौ. छाया निनावे
- नागपूर